दादर रेल्वे आरपीएफ जवानाची धाडसी कारवाई
मुंबई, दादासाहेब येंधे : दादर येथे धावती ट्रेन पकडत असताना शोभा कुमारी (वय २० ) या महिलेचा तोल जाऊन ती प्लॅटफॉर्मवर पडली. हे लक्षात येताच गस्तीवर असलेले आरपीएफ जवान अशोक यादव याने प्रसंगावधान दाखवत धावत जाऊन तिचे व तिच्या मुलाचे प्राण वाचविले.
दादर प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर सीएसएमटी- दानापूर स्पेशल ट्रेन सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सुटणार होती. त्या ट्रेनने शोभा कुमारी दानापूरला जाणार होती. ती खुशालपूर, नालंदा बिहार येथील आहे. आरपीएफ जवान अशोक यादव यांच्या तत्परतेमुळे त्या महिलेचे व तिच्या लहान बाळाचे प्राण वाचले आहेत.

0 टिप्पण्या