Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ नागरिक, अपंगांना गाडीतच लस

दादरमध्ये ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशनचा प्रारंभ

मुंबई : ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना कोविड प्रतिबंध लस घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने दादरमधील बहुमजली कोहिनुर स्क्वेअर इमारतीमधील सार्वजनिक वाहनतळात 'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र' सुरू केले आहे. येथे वरिष्ठ नागरिक आणि शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना गाडीतच बसून लस घेता येणार आहे. देशातील हे सर्वात पहिले लसीकरण केंद्र ठरले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या