Ticker

6/recent/ticker-posts

केशरी शिधापत्रिकाधारकांना जुन महिन्यासाठी सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वितरण

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ  न  मिळालेल्या मुंबई-ठाणे क्षेत्रातील शिधापत्रिका धारकांना मिळणार लाभ

मुंबई दि. २९-मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए.पी.एल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे जुन २०२१ करीता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ  देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई  नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा  कैलास पगारे यांनी दिली. 

राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ए.पी.एल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे- २०२० ते ऑगस्ट २०२० या चार महिन्याच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने  गहु रुपये ८/- प्रति किलो व तांदुळ रुपये १२ प्रति किलो प्रतिमाह प्रतिव्यक्ती  ३ किलो गहु व दोन किलो तांदुळ याप्रमाणे ५किलो अन्नधान्याचा सवलतीच्या दराने लाभ देण्यात आला आहे. 

या योजनेतील अधिकृत शिधावाटप दुकानामध्ये शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे वाटप ए.पी.एल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती १ किलो गहु व १ किलो तांदुळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य माहे जून २०२१ करीता गहु रुपये ८ प्रतिकिलो व तांदुळ रुपये १२ प्रतिकिलो या सवलतीच्या दराने वितरण करण्यात येईल. 

ए.पी.एल (केशरी) शिधापत्रिकाधारकांपैकी जे शिधापत्रिकाधारक अन्नधान्याची प्रथम मागणी करतील (FIRST COME FIRST SERVE) त्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य वितरण करण्यात येतील. 

        सदर योजनेतील ज्या अधिकृत शिधावाटप दुकानामध्ये सदर योजनेतील अन्नधान्य शिल्लक आहे त्याच शिधावाटप दुकानातून अन्नधान्य वितरण करण्यात येईल. 

        ए.पी.एल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की,  अधिकृत शिधावाटप दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग तसेच मास्कचा वापर करुन सवलतीच्या दराने मिळणारे उपलब्ध अन्नधान्य प्राप्त करुन घ्यावे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या