माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंत्रालय येथे अभिवादन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, २२ मे, २०२१

demo-image

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंत्रालय येथे अभिवादन

मुंबई : माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल (२१मे) मंत्रालयात उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई तसेच वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. अमित देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी उपस्थितांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त देशाची अखंडता, व सहिष्णूता यावर निष्ठा ठेवून सर्व प्रकारच्या दहशतवाद, हिंसाचाराचा मुकाबला करण्याची, सर्व मानवजातीत शांती, सामाजिक एकोपा, सामंजस्य टिकवित मानवी मूल्यांना धोका पोहचविणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु, अशी शपथ दिली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्री. लोकेश चंद्रा, सहसचिव श्री. वारभुवन यांच्यासह विविध विभागाचे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25B6%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A6+%25E0%25A4%25B5+%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2582%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259A%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0+%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B0%25E0%25A5%258B%25E0%25A4%25A7%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25A4+%25E0%25A4%25B6%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25A5+%25E0%25A4%25A6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BE+2


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *