Ticker

6/recent/ticker-posts

आज चौथी ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात पोहोचली

ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) देऊन कोविड -१९ च्या विरोधातील  आपला लढा रेल्वेने चालू ठेवला आहे. चौथ्या ऑक्सिजन एक्सप्रेस दि. ९.५.२०२१ रोजी मध्यरात्री २.२५ वाजता नागपूरला पोहचली. ऑक्सिजन एक्सप्रेसने ६० टन एलएमओसह ४ टँकरची वाहतूक अंगूल ते नागपूर येथे केली.  यापूर्वी महाराष्ट्रामध्ये प्रथम विशाखापट्टणम ते नागपूर / नाशिक रोड (७ टँकरमध्ये एलएमओ), दुसरी हापा ते कळंबोली (३ टँकरमध्ये एलएमओ) आणि तिसरी अंगुल ते नागपूर (४ टँकरमध्ये एलएमओ) अशा तीन ऑक्सिजन एक्सप्रेस यापूर्वी पोहोचल्या आहेत. 


ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे आतापर्यंत महाराष्ट्रात २९० मेट्रिक टनपेक्षा जास्त लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) आणण्यात  आले आहे.

 देशभर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) पोहोचवून कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी देशाच्या प्रयत्नात रेल्वेचे योगदान कायम आहे.








































 प्रप नं .2021 / 05/13 
फोटो : व्हायरल 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या