Ticker

6/recent/ticker-posts

पोलिसांसाठी आलिशान हॉटेलमध्ये आयसोलेशन सेंटर

मुंबई : पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी गोरेगाव पूर्वेकडील द फेर्न हॉटेलमध्ये आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. बुधवारी उत्तर प्रदेश प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले आहे.

कोरोना विरुद्धच्या लढ्यात आतापर्यंत १५० हून अधिक पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता जे पोलीस अधिकारी अंमलदार व त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित आहेत व त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत अशा पोलिसांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विलगीकरण याचा सल्ला दिलेला आहे असे रुग्ण घरी राहिल्यास कुटुंबातील इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सेल कंपनी व जीतो फाऊंडेशनने मुंबई शहरातील पोलिस अधिकारी अंमलदार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या