राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जवळपास 38 हजार हेक्टर इतकी विक्रमी फळबाग लागवड झाली आहे. ही समाधानाची बाब असतांना त्या तुलनेत जिल्ह्यातील आकडेवारी समाधानकारक नसल्याने मंत्री श्री.भुसे यांनी शेततळे व फळबाग लागवडीचे उद्दीष्ट विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी योजनेची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे मंत्री श्री.भुसे
यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती
राजेद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन
मुंडावरे, उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप
देवरे, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब
व्यवहारे, तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण शिंदे आदि उपस्थित
होते.
आयोजित आढावा बैठकीमध्ये महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत शेततळे, फळबाग लागवड याविषयी चर्चा करण्यात
आली. यामध्ये तालुक्यात कृषी विभागाने सन 2020 केवळ 10.60 हेक्टरवर लागवड केल्याची, तर 2021 मध्ये 138 शेततळे मंजूर असुन केवळ 26 कामांना मंजूरी मिळाल्याची माहिती
देण्यात आली. मालेगाव तालुक्यामध्ये या योजनेतंर्गत शेततळे आणि किमान 1 हजार हेक्टरवर फळबाग लागवड
करण्याच्या सुचना कृषी विभागास देण्यात आल्या. येत्या 8 दिवसात सर्व शेतकऱ्यांचे प्रस्ताव
तातडीने मंजूर करावेत. चालू हंगामात शेतकरी बांधवांना शेततळ्याच्या पाण्याचा फायदा
होईल या दृष्टीने नियोजन करावे. मागील दोन वर्षापासून डाळींब लागवडीची शेतकऱ्यांना
गरज असून त्यानुसार लागवड करण्यात यावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी योजनेतंर्गतची कामे करत असताना कृषी विभागास महसूल व ग्रामविकास
विभागाने सहकार्य करावे आणि कृषी विभागाच्या अडचणी सोडविण्यासाठी दरमहा झालेल्या
कामांचा आढावा घेण्याच्या सुचनाही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या.
गगनभरारी समूहाचा एक हात मदतीचा
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी उदात्त भावनेच्या व्यक्ती एकत्र आल्या की खूप मोठे काम करु शकतात. याची प्रचिती नुकतीच मालेगावातील गगनभरारी समूहाच्या महिला शिक्षिकांनी पूर्णत्वास नेलेल्या एका कार्यातून आली. कोविड रूग्णांसाठी, नेब्युलायझर, पल्स आँक्सिमीटर, स्टिमर, संपर्कासाठी फोन आणि म्युझीक सिस्टम व इतर आवश्यक साहित्य घेण्यात आले. या साहित्याचे मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कोवीड सेंटरला हस्तांतर करण्यात आले.
प्राथमिक शिक्षिका वैशाली भामरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यांच्यासोबत समाजसेविका संगिता चव्हाण, नूतन चौधरी, छाया पाटील, ज्योती पाटील, मनिषा सावळे, साधना ब्राह्मणकर, छाया देसले व इतरांनी पुढाकार घेतला. कोरोनाकाळात वैद्यकीय सोयीसुविधांच्या कमतरतेमुळे येणाऱ्या अडचणी पाहून कोविड सेंटरला मदत करायचे ठरवले. त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी मंत्री दादाजी भुसे, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.

0 टिप्पण्या