Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस प्रशासनात हस्तक्षेप नाही

नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भूमिका

मुंबई : "स्वच्छ व पारदर्शक प्रशासनासह पोलीस प्रशासनात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही. याची पूर्णतः दक्षता घेऊन जबाबदारी पार पाडणार," अशी भावना नवनियुक्त गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज व्यक्त केली. मंत्रालयातील दालनात वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "आव्हानात्मक काळात पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांत पोलीस दलाबाबत विश्वास निर्माण होईल यासाठी कटिबद्ध आहे," असेही ते म्हणाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या