Ticker

6/recent/ticker-posts

'ऑक्सिजन एक्सप्रेस' महाराष्ट्रात दाखल

कळंबोली ते विशाखापट्टणम अन विझाग ते  नाशिकपर्यंत धावली

मुंबई : रेल्वेने ऑक्सीजन एक्सप्रेसची वाहतूक एक आव्हान म्हणून स्वीकारत कळंबोली ते विशाखापट्टणम अन विझाग ते  नाशिकपर्यंत पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस यशस्वीपणे चालवली. यामुळे आता ऑक्सिजनचा वेळेत पुरवठा होणे शक्य झाले आहे. 

सरकारने ऑक्सीजन टँकरच्या वाहतुकीसाठी रेल्वेला विनंती करताच रेल्वे द्वारा विविध ठिकाणी त्वरित रॅम्प बनविण्यात  आले. मुंबई विभागाच्या टीमने कळंबोली येथे फक्त २४ तासांत रॅम्प बनवण्याचे कौतुकास्पद काम केले. रो-रो सेवेच्या वाहतुकीसाठी रेल्वेला घाट सेक्शन, रोड ओव्हर ब्रिज, इत्यादी ठिकाणांच्या बाधा लक्षात घेऊन संपूर्ण मार्गाचा नकाशा बनवायचा होता. कारण उंची ही यातील महत्त्वाची बाब असल्याने रेल्वेनर वसईमार्गे नकाशा तयार केला आणि रेल्वेवर ऑक्सिजन ट्रक ठेवून ऑक्सिजन ट्रेन विशापट्टणमकडे रवाना झाली होती.

असा झाला प्रवास 

कळंबोली ते  विझागमधील अंतर १८५० किलोमीटरहून अधिक आहे. जे या ट्रेनने साधारणतः ५० तासात पूर्ण केले. १०० टनांपेक्षा जास्त लिक्विड मेडिकल ऑक्सिजन असलेले ७ टॅंकर १० तासात लोड केले गेले आणि केवळ २१ तासांत नागपुरात परत आणले गेले. काल नागपुरात रेल्वेने ३ टॅंकर उतरवले आहेत आणि उर्वरित ४ टॅंकर केवळ १२ तासांत नागपूरहून आज सकाळी १०.२५ वाजता नाशिकला पोहोचेल.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या