मुंबई : माजी खासदार सन्माननीय एकनाथराव गायकवाड साहेबांच्या निधनाने समाजातील वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. एकनाथराव गायकवाड साहेबांचे नेतृत्व समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचलेले, सर्वमान्य नेतृत्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रगाढ निष्ठा आणि काँग्रेसच्या विचारधारेशी ते जीवनभर प्रामाणिक राहिले. त्यांचे निधन ही समाजातील पुरोगामी, सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे. आम्ही सर्वजण गायकवाड साहेबांच्या कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
0 टिप्पण्या