ऑक्सिजन एक्सप्रेस मुंबईत दाखल - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

ऑक्सिजन एक्सप्रेस मुंबईत दाखल


नवी मुंबई :
गुजरातमधील हापा येथून आलेली ऑक्सिजन एक्सप्रेस सोमवारी कळंबोली दाखल झाली. त्यामुळे मुंबईसाठी ४४ मेट्रिक टन ऑक्सीजन साठा उपलब्ध झाला आहे. रविवारी गुजरात मधील जामनगर रिलायन्स प्लांट येथून संध्याकाळी ६ वाजता पश्चिम रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस मुंबई साठी रवाना झाली होती. मध्य रेल्वेच्या माध्यमातून १९ एप्रिल रोजी विशाखापटनम प्लांटमधील ऑक्सिजन आणण्यासाठी कळंबोली येथून पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस धावली. ती ऑक्सिजन आणण्यासाठी यशस्वी झाल्यानंतर पश्चिम रेल्वेनेही दुसऱ्या राज्यातून लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी पुढाकार घेतला आहे.

फोटो: गुजरातहुन निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस सोमवारी सकाळी कळंबोली रेल्वेस्थानकावर दाखल झाली. तीन टॅंकरमध्ये ४४ मेट्रिक टन टन साठा आहे. या एक्सप्रेसने ८६० किमीचा प्रवास १९ तासात पार केला. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज