ठाणे लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरांच्या आवळल्या मुसक्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

ठाणे लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरांच्या आवळल्या मुसक्या

ठाणे रेल्वे पोलीस ठाणेची उत्कृष्ट कामगिरी

ठाणे, दादासाहेब येंधे : ठाणे रेल्वे पोलीस ठाणे गु.र.न.३४/२०२१ कलम ३९२ प्रमाणे दाखल गुन्हयातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार समीर रफिक शेख उर्फ कालोमांग, राहणार मुंब्रा याने  गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने मा कैसर खालिद, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, मा.प्रदीप चव्हाण, पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई आयुकत, कल्याण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीसचे सुचनेनुसार पोलीस ठाणेतील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ३८१ मडब, पोहवा/१९२७ बागले, पोहवा/ ३६१ कोयंडे, पोशि/७१७ नाटेकर, पोशि/६५० नदाफ, रणमाळ, पोशि/६८० चव्हाण, पोशि/ ०१५ सोनताटे, यांनी त्या अनुषंगाने तपास केला सपोनि /पाटील यांचे विश्वासु तंत्रज्ञ श्री. पुष्कर झांटे यांचो मदत घेतली असता सदरचा आरोपी हा औरंगाबाद येथे असल्याचे तांत्रिक तपासावरून निष्पन्न झाले.  

त्याप्रमाणे एक पथक तयार करून त्यांचे माध्यमातुन मु.नारेगांब, जि. औरंगाबाद, एम.आय.डो.सो. सिडको येथुन आरोपो नामे - समिर रफिक शेख, उर्फ कालोमांग, राह. मुंब्रा यास कौशल्याने ताब्यात घेवुन त्याच्याकडे केलेल्या तपासावरून मोबाईल तसेच  संगणक, डीव्हीआर. हार्डडिस्क व इतर साहित्य नमुद गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर मुददेमाल त्याने ठाणे रेल्वे पोलोस ठाणे कार्यक्षेत्रात जबरीने चोरी कल्याचे तांत्रिकदृष्टया निष्पन्न झाले आहे.

तसेच आरोपीने पनवेल रेल्वे पोलोस ठाणे येथोल गुर.नं. ५०/२०२१ भा.द.वि. कलम ३९२ मधील फिर्यादी यांचा मोबाईल फोन जबरिने चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्हयातील देखील मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे. नमुद आरोपी  पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याने चोरी केलेले मोबाईल फोन ज्या इसमाकडे देण्यात आले होते त्या  इसमास अटक केली असता त्याचेकडे एकुण ०८ मोबाईल फोन घेतल्याचे निष्पन्न झाल्याने सदर इसमाकडोल रू १,४६,४८९/- किंमतीचे मोबाईल फोन मिळुन आले.

तसेच त्याच्याकडील संगणक, डीव्हीआर. हार्डडिस्क तसेच इतर साहीत्व जप्त करण्यात आले आहेत. अशी माहिती ठाणे रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.जी.खडकोकर यांनी दिली. 

रजि  क्र . ३४. २०२१ भावि. क्र. ३९२ प्रमाणे दाखल


















































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज