Ticker

6/recent/ticker-posts

गुढीपाडवा निमित्त मार्गदर्शक सूचना जारी

गुढीपाडवा सणानिमित्त मार्गदर्शक सूचना

सालाबादप्रमाणे गुढी पाडवा हा सण या वर्षी दि. १३ एप्रिल, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. सदर सण हा राज्यात नविन वर्ष म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो. तथापि, सध्या कोविड- १९ च्या दुसऱया लाटेमुळे उद्भवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता व वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक ४ एप्रिल, २०२१ नुसार पारीत केलेल्या आदेशानुसार व त्यातील मुद्दा क्र. १, २ व १३ च्या अधिन राहून या वर्षी गुढी पाडवा हा सण साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत:-

१) गेल्या वर्षी राज्यात कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन आजपर्यंत झालेले सर्व सण/उत्सव हे अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न जमता साजरे केलेले आहेत. सध्या कोरोनाच्या संसर्गाच्या प्रमाणात गेल्या वर्षी पेक्षा जास्त वाढ होत आहे. त्यामुळे यावर्षी गुढीपाडवा हा सण कोविड- १९ चा वाढता प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने अत्यंत साधेपणाने सकाळी ७.०० वाजेपासून संध्याकाळी ८.०० वाजण्यापुर्वी साजरा करणे अपेक्षित आहे.

२) राज्यात कांही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपारिक वेशभूषा परिधान करुन तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करुन नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येत असतो. कोविड- १९ या विषाणूचा वाढता फैलाव रोखण्याच्या दृष्टीने यावर्षी गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिडी, प्रभात फेरी, बाईक रॅली व मिरवणुका काढण्यात येऊ नयेत तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याएवेजी आता सार्वजनिक ठिकाणी एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्‍तींनी डिस्टन्सींगचे व नियमांचे काटेकोरपणे व्यक्‍तींना एकत्रन येता सोशल डिस्टन्सींगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करून घरगुती गुढी उभारुन हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा.

3) गुढीपाडवा या सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे (उदा. रक्‍तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुवानुमतीने आयोाजत करता यंताल आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापि आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोविड विषयक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.

४) राज्यातील कोविड- १९ विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष गुढीपाडव्याच्या दिनांकापर्यंत शासनस्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या  संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२१०४१२१२०८१८७७२९ आहे. 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या