सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे व रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी यांनी दोन संशयीतांना ८०,०००/- रुपये किमतीच्या अंमली पदार्थासह केले अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे व रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी यांनी दोन संशयीतांना ८०,०००/- रुपये किमतीच्या अंमली पदार्थासह केले अटक

सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे, मुंबई. या पोलीस ठाणेच्या हद्दीत दोन संशयीत इसम अंमली पदार्थ गांजा विक्री करीता वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने त्यांना सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणेच्या पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्‍त कारवाही एकुण ८०,०००/- रुपये किमतीच्या ०८ किलो वजनाचा गांजा या अंमली पदार्थासह केले अटक आहे. 

मा. पोलीस आयुक्त सो, श्री.केसर खालीद सो, लोहमार्ग, मुंबई. यांच्या निर्देशानुसार व पोलीस उप-आयुक्‍्त सो, श्री. चव्हाण सो, यांच्या मार्गदर्शनानुसार सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे, व रेल्वे सुरक्षा बल, सीएसएमटी, मुंबई. यांनी घातपात व चेकींग तपासणी दरम्यान केलेल्या संयुक्‍त कारवाहीत दि. २७.०४.२०२१ रोजी ०३.४० वा. आलेल्या कोणार्क एक्सप्रेस मधुन उतरुन ०७.४५ वा. दोन संशयीत इसम हे त्यांच्याकडील दोन बॅगांमध्ये गांजा हे अमली पदार्थ विक्री करणे कामी स्वतःजवळ बाळगुन वाहतुक करीत असतांना फलाट क्र.१८ येथील व्हीईकल स्कॅनर मशिनच्या बिट पॉईन्ट जवळ मिळुन आल्याने व त्यांना पोलीसांनी हटकले असता, ते पळुन जाण्याचा प्रयत्न करुन उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलीस निरीक्षक/श्री. भगवान डांगे, व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे एस.आय/श्री. खान व त्यांच्या सोबत असलेले कर्मचारी यांनी सदरच्या इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव- आरोपी क्र. ०१ त्याचे नाव- मोहम्मद जुही मोहम्मद हासीम नदाफ वय-६० वर्षे, व्यवसाय- कटलरी विकणे, राह- सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या बाहेरील फुटपाथ, मुंबई (फिरस्ता) गावचा पत्ता- भरीयाई ता.जि. दरभंगा, राज्य- बिहार. आरोपी क्र.०२ याने त्याचे नाव- शंकर ईश्वर मुरारी पाल, वय-५५ वर्षे, व्यवसाय- मलीश करणे राह- सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या बाहेरील फुटपाथ, मुंबई (फिरस्ता) गावचा पत्ता- स्विच पार्क, रविन्द्र सदन रोड, ट्रॉली गंज, कलकत्ता. असे सांगितले. यांची लागलीच पंचांच्या समक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या दोन बॅगांमध्ये ८०,०००/- रुपये किंमतीचा एकुण ०८ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने सदर मुद्देमेल लागलीच दोन पंचांच्या समक्ष ताब्यात घेवुन त्यांचे विरुद्ध सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि. करुन कारवाही करण्यात आली आहे.

सदरची कारवाही मा. मा. पोलीस आयुक्‍त सो, श्री.केसर खालीद सो, लोहमार्ग, मुंबई. यांच्या निर्देशानुसार पोलीस उप-आयुक्त सो, (मध्य व पश्‍चिम परिमंडळ) श्री. चव्हाण सो, यांच्या मार्गदर्शनानुसार सहा. पोलीस आयुक्‍त सो, श्री. काटकर सो, यांच्या सुचनांनुसार वपोनि/ प्रविण भगत, पोलीस निरीक्षक/ श्री. भगवान डांगे, सहा.पोलीस निरीक्षक/ शेख, महीला पोलीस उप-निरीक्षक/ मदकट्टे सो, पोलीस उप-निरीक्षक/श्री. पाडेकर, व रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी आरपीएफ निरीक्षक/ श्री.कासार, एस.आय./श्री.वाय.के. खान, व पोलीस हवा/३२४१ नलगे,/ २५८१ क्षिरसागर, पोलीस नाईक/९३१ मानेरसुरे, पोलिस शिपाई/४४४ रेवगडे,/ ५७४ निकाळे,/५७६ भारुड,यांनी केली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक/ श्री. ए.के.पाडेकर हे करीत असुन सदरचा गांजा हा कोणास देणार होता याबाबत पोलीस सविस्तर तपास करीत आहेत अशी माहिती सीएसएमटी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी  दिली आहे.  






 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज