मुंबई : दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनामुळे राज्य सरकारने लागू केलेल्या वीकेंड लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी होताना दिसत आहे. रोज भरभरून वाहणारे मुंबईतील रस्ते, रेल्वे स्थानकांच्या परिसरात आज सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळत आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांनी गस्त घालायला सुरुवात केली होती. रस्त्यावर कोणीही कामाशिवाय फिरकताना दिसत नव्हते. अत्यावश्यक सेवा वगळता खासगी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.






0 टिप्पण्या