मुंबई : जागतिक पुनर्वापर दिवसानिमित्त प्लास्टिकचे संग्रह व पुनर्वापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी 'प्लास्टिक लाओ, मास्क पाओ' या एक महिन्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. ही मोहीम संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम भारत, बृहन्मुंबई महानगरपालिका, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि स्त्री मुक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.
आपली संसाधने टिकवून ठेवण्यात पुनर्वापराची महत्त्वपूर्ण भूमिका जागतिक पुनर्वापर दिवस अधोरेखित करून साजरा केला जातो. वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाच्या संकटाला तोंड देण्यासाठी मध्य रेल्वेने प्रकल्प भागीदारांसह छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस व दादर रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक कचरा संकलन केंद्र तयार केले आहेत. सर्व प्रकारचा प्लास्टिक कचरा म्हणजेच प्लास्टिक बाटल्या, पॉलिथिन पिशव्या आदी मास्कच्या बदल्यात प्रवाशांना देता येणार आहेत.


0 टिप्पण्या