Ticker

6/recent/ticker-posts

आजादी का अमृत महोत्सव’ हा देशवासियांच्या मनांना जोडणारा उपक्रम - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त देशभरात साजरा होत असलेला ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा देशवासियांच्या मनांना जोडणारा उपक्रम आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावेअसे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त देशभरात साजरा होत असलेल्या ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाला.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणालेभारतीय स्वातंत्र्य लढ्यात देशभरातील अनेक महापुरूषांनी बलिदान दिले आहे. यात स्वातंत्र्यासाठी मोठे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील महापुरूषांचेही योगदान आहे. देशाचा इतिहास आणि महापुरूषांच्या बलिदानाचे स्मरण करून आदर्श भारत आणि महाराष्ट्र निर्माण करूया. जगभरातील देशात नाहीत तेवढे किल्ले महाराष्ट्रात आहेत. हा ऐतिहासिक ठेवा असून त्याचे सर्वांना स्मरण असले पाहिजे. युवा पिढीने याचा आदर्श घेऊन पुढील वाटचाल करण्याची गरज आहे.

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या