Ticker

6/recent/ticker-posts

नियमावली पुन्हा कडक

राज्यात ३१ मार्चपर्यंत नवे निर्बंध

मुंबई : सर्व प्रकारच्या राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने आज पुन्हा घेतला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. येत्या ३१ तारखेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. मृत्युदर कमी असला तरी वाढती रुग्णसंख्या चिंतेत भर घालणारी ठरली आहे. त्यामुळेच नागरिकांना शिस्त लावण्यासाठी निर्बंध लावले जाण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही कडक निर्बंध लावण्यात येतील, असे नुकतेच जाहीर केले होते. नवे निर्बंध तात्काळ लागू होणार असून, ३१ मार्च रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

नवी नियमावली

- हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने चालविण्यास परवानगी

- राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी

- लग्न समारंभाला केवळ ५०, तर अंत्यविधीला केवळ २० जण उपस्थित.

- अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने चालवावीत.

- वर्क फ्रॉम होम वर भर द्यावा.

- धार्मिक स्थळी भाविकांची संख्या मर्यादित ठेवावी.

- मॉलमध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे गरजेचे

- होम क्वारंटाइन असलेल्यांच्या हातावर शिक्का बंधनकारक.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या