आरोग्य
विज्ञान विद्यापीठाचा २० वा दीक्षांत समारोह संपन्न
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विसावा दीक्षांत
समारोह राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत शुक्रवारी
(दि. २९) ऑनलाईन पद्धतीने झाला.
दीक्षांत भाषणात राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, सर्वत्र परीक्षा नको असा सूर
असताना वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांनी निष्ठेने अभ्यास केला. परीक्षा दिल्या व
लगेचच रुग्णसेवा कार्यात स्वतःला झोकून दिले. हे त्यांचे कार्य शब्दातीत होते. या
कार्यात वैद्यकीय शिक्षकांनी देखील सहकार्य केले. सर्व वैद्यकीय परीक्षा वेळेवर
घेऊन, त्यांचे निकाल वेळेत लावल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ
दिलीप म्हैसेकर यांचे कौतुक केले.
एकीकडे आरोग्यसेवा व वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन होत असताना
जगभरात कोरोनासारखे नवनवे आजार देखील येत आहेत. त्यामुळे वैद्यकीय शाखेतील
स्नातकांनी सर्व प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे असे
राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.
आज जगभरात योग तसेच आयुर्वेदाबद्दल लोकांमध्ये कमालीचे औत्सुक्य आहे.
त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना अंतर-शाखीय (इंटर डीसिप्लीनरी) अभ्यास करण्याची
सुविधा असावी, असेही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.
यावेळी विविध वैद्यकीय विद्याशाखांमधील ८०६४ स्नातकांना पदवी, पदविका, पदव्युतर पदवी, पीएच.डी.
तसेच प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना
सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा