नायलॉन मांजाने चिरला पोलीस अधिकाऱ्याचा गळा
मुंबई, दादासाहेब येंधे : पतंग उडवताना नायलॉन मांजावर बंदी असतानाही त्याचा सर्रास वापर केला जात असल्याने अनेकांच्या जीवावर बेतण्याच्या घटना घडत आहेत. अशाच एका घटनेत शनिवारी वरळी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याचा जे.जे. मार्ग जंक्शनवर गळा चिरला गेल्याची घटना घडली। आहे.
स.पो.नि. राकेश गवळी असे जखमी सपोनि यांचे नाव असून शनिवारी ते दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. ते जे.जे. मार्ग जंक्शन येथे पोहोचताच अचानक एक मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. दुचाकीवर नियंत्रण मिळविण्याआधीच मांजाने त्यांचा गळा चिरला. हा प्रकार पाहताच ड्युटीवर असलेले वाहतूक हवालदार शिंदे यांनी तात्काळ याची माहिती वरिष्ठांना दिली आणि जखमीला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त परमजीत सिंह यांना मिळताच त्यांनी गवळी यांना तात्काळ उपचारासाठी व्होकार्ट रुग्णालयात दाखल केले. प्लास्टिक सर्जरी वेळेत झाल्याने त्यांचे प्राण वाचले.गवळी यांच्या गळ्याला १० टाके पडले असून वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा आवाज थोडक्यात बचावला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा