लसीकरणांनंतरही मास्क वापरणे बंधनकारक, मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना
मुंबई, दादासाहेब येंधे : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ मुंबईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे लसीकरण केंद्रात झाला. आज आपण एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत. आणि हेच ते ठिकाण आहे काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांनी भरून वाहत होते. मात्र, आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना मी मनाचा मुजरा करतो'. असे म्हणत राज्याचे मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योध्यांचे कौतुक केले.
काल देशभर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या बीकेसी येथील लसीकरण केंद्रात मुख्यमंती उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली.
या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी जनतेशीही संवाद साधला. ते म्हणाले, 'लसीकरणाला आज सुरुवात होतेय, सर्वाना लस मिळायला अजून काही महिने लोटतील. या लसीचा प्रभाव किती काळ राहणार हे कळेपर्यंत एक-एक दिवस गेल्यानंतर कळणार आहे. पण, आपल्या तोंडावर असलेलं मास्क हीच एक उत्तम लस आहे. लस घेतल्यानंतरही मास्क वापरावाच लागणार आहे.' अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा