Ticker

6/recent/ticker-posts

भारत-ब्रिटन विमानसेवा स्थगित

 भारत-ब्रिटन विमानसेवा स्थगित

ब्रिटनमध्ये कोरोनाविषाणू ने बदललेल्या स्वरूपात डोकेवर काढल्यानंतर भारताने आज मंगळवार मध्यरात्रीपासून ब्रिटन भारत दरम्यानच्या विमान सेवेवर ३१ डिसेंबर पर्यंतच्या मध्यरात्री पर्यंत दहा दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

इतर देशांमध्ये अशा प्रकारचा कोरोनाविषाणू असल्याचे लक्षात आल्यास तेथील विमानसेवाही स्थगित करण्याचा विचार केला जाईल, असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हार्दिक सिंह पुरी यांनी म्हटले आहे.

ब्रिटनमधून उद्या मध्यरात्रीपर्यंत भारतात दाखल होणाऱ्या विमानातील प्रवाशांची विमानतळावरच RT-PCR चाचणी करण्यात येणार आहेत. या स्थगितीमुळे नाताळच्या सुटीसाठी भारतात येण्याच्या तयारीत असलेले अनेक विद्यार्थी ब्रिटनमध्ये अडकले आहेत. 

भारत सरकारने ब्रिटनमधून सुरू होणाऱ्या सर्व विमानसेवा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने जाहीर केले आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या