झेडपी शिक्षकाला ग्लोबल टीचर म्हणून पुरस्कार - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

झेडपी शिक्षकाला ग्लोबल टीचर म्हणून पुरस्कार

सोलापूरच्या शिक्षकाला सात कोटींचा पुरस्कार

दादासाहेब येंधे :

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार नुकताच जाहीर झाला. सात कोटींचा हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले सर यांना जाहीर झाला आहे. 

तब्बल सात कोटी रकमेचा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. या पुरस्कारासोबतच त्यांना जगातील सर्वोत्तम शिक्षक हा बहुमान प्राप्त झाला आहे. 

१४० देशातील १२ हजारांहून अधिक नामांकनातून शिक्षक डिसले यांची यासाठी निवड म्हणजे ग्रामीण शिक्षकांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.



1 टिप्पणी:

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज