मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती
मुंबई, दादासाहेब येंधे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता योग्य खबरदारी घेत आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. मात्र, काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करीत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी. अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. कोरोना लसीकरण आणि तिच्या वितरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
सिरम इन्स्टिट्यूटचे पूनावाला यांच्याशी संपर्कात असून लसीकरणासाठी काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक असून लसीची उपलब्धता, त्यासाठी येणारा खर्च, त्याचे वितरण, परिणाम, दुष्परिणामांबाबत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असून त्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा केली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

0 टिप्पण्या