Ticker

6/recent/ticker-posts

एक दिवाळी सामाजिक कर्तव्याची

 कॅन्सरग्रस्त मुलांसोबत दिवाळी 

मुंबई, दादासाहेब येंधे : जीवन प्रबोधिनी  ट्रस्ट  यांच्या विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी  देखील कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढणाऱ्या  मुलांसोबत संत गाडगेबाबा महाराज ट्रस्ट, दादर पूर्व येथे दिवाळी साजरी करण्यात आली. सलग ७ व्या वर्षी या आगळ्या वेगळ्या दिवाळीचे आयोजन करण्यात आले होते.  

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक दुरीचे देखील पालन करण्यात आले. कार्यक्रमात  लहान मुलांना ब्लँकेट, खेळणी, दिवाळी मिठाई भेट व जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. ह्या प्रसंगी संस्थेचे संस्थापक श्री सत्यवान नर, वैष्ण समाजाचे सरचिटणीस श्री स्वप्निल बोभाटे, अध्यक्ष अमित पवार, सरचिटणीस हेमंत मकवाना, खजिनदार श्रेयस घाटकर, कार्यकारिणी सदस्य रवि जाधव, विनायक येंधे, गणेश पार्टे, साहेबराव शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या