Ticker

6/recent/ticker-posts

डी.एन. नगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सोनसाखळी चोरी प्रतिबंधक नाकाबंदी दरम्यान केली उत्तम कामगिरी

 डी.एन. नगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सोनसाखळी चोरी प्रतिबंधक नाकाबंदी दरम्यान केली उत्तम कामगिरी


दिनांक २६/१०/२०२० रोजी सकाळी ०६.३० वा. चे सुमारास डी.एन. नगर पोलिस ठाणे हद्दीतील शिवप्रसाद नाका, गोखले ब्रिजजवळ, सपोनि पाटील; पोलीस अंमलदार ११०४९२/पवार व  १०९१९६१/शेळके हे नाकाबंदी करत असताना, गोखले ब्रीजवरुन येणाऱ्या एका भरधाव  मोटरसायकल स्वारास त्यांनी थांबण्याचा इशारा केला असता, पोलिसांचा इशारा न मानता पळून जाऊ लागले तेव्हा  नाकाबंदी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व अमलदारांनी त्यांचा पाठलाग केला असता, गाडीचे पाठीमागे बसलेला इसम पळून जाण्यात यशस्वी झाला.

        मोटार सायकल चालविणारे  इसमास शिताफिने ताब्यात घेऊन  त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात 3 चोरीचे मोबाईल हॅण्डसेट मिळुन आले. तसेच त्याचे ताब्यातील मोटारसायकल क्रंमाक MH 02 FF 0166 बाबत अधिक चौकशी केली असता, सदरची मोटर सायकल विलेपार्ले पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेली  असल्याबाबत माहिती मिळाली. सदर बाबत विलेपार्ले पोलीस ठाणे. येथे गुन्हा रजि. क्रमांक 406 / 2020 कलम 379 भादवि अन्वये गुन्हा नोंद आहे.

        ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव - सद्दाम शहाबुद्दीन शेख. वय 28 वर्षे, रा. ठि. रूम क्रमांक 1101, 11वा माळा प्रमुख हाइट बिल्डिंग च्या मागे वीरा देसाई रोड, अंबोली जोगेश्वरी पश्चिम, मुंबई येथे राहत आहे. 

         ताब्यात घेतलेल्या इसमाकडे त्याचे साथीदार व इतर चोरीचे गुन्हया बाबत अधिक चौकशी सुरु आहे.  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या