Ticker

6/recent/ticker-posts

महापौरांवर कारवाई कधी..?

मुंबई, दादासाहेब येंधे :  
महापौर  किशोरी पेडणेकर यांनी नियमबाह्यपणे पालिकेच्या कोरोना केंद्राचे कंत्राट मिळवले आहे. तसेच एसआरएची योजनेत घरांचा बेकायदा ताबा मिळवला आहे, असे आरोप करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी, सोमवारी पालिका मुख्यालयासमोर धरणे धरले. त्यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना ताब्यात घेतले. 

महापौरांच्या मुलाच्या नावे किश कॉर्पोरेट इंडिया प्रायवेट लिमिटेड हि कंपनी वरळीच्या गोमती जनता सोसायटीच्या पत्यावर असून या पत्यावर आठ बोगस कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत. त्या सगळ्याच कंपन्यांचे मालकी हक्क, आर्थिक हितसंबंध, व्यवहारातील पारदर्शकता आणि त्यातील आर्थिकक व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान, महापौरांनी सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या