सीएसएमटी येथे जनजागृतीपर पथनाट्य - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, १२ जुलै, २०२३

सीएसएमटी येथे जनजागृतीपर पथनाट्य

रेल्वे प्रवासी सुरक्षा व महिला सुरक्षा संदर्भात जनजागृतीपर पथनाट्य 

१२ जुलै २०२३


दादासाहेब येंधे : काल ११ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सीएसएमटी रेल्वे स्टेशन  परिसरात रेल्वे प्रवासी सुरक्षा व महिला सुरक्षेच्या अनुषंगाने सत्कर्व ग्रुप, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावतीने पथनाट्य सादर करण्यात आले.

 व्हिडिओ पहा...👇


सदर पथनाट्य दरम्यान पोलीस ठाणे मधील महिला पोलीस अंमलदार यांनी हातामध्ये महिला सुरक्षेबाबतचे फलक घेऊन जनजागृती केली. कार्यक्रमात वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. तायडे, पोलीस निरीक्षक सचिन मोरे, पोलीस उप-निरी. तानाजी भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक ज्योती मदकट्टे तसेच १७ पोलीस अंमलदार हजर होते.

पथनाट्य द्वारे आलेल्या कलाकारांनी खालील प्रमाणे संदेश देऊन जनजागृती केलेली आहॆ. सदर पथनाट्यास प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली.

महिला प्रवाशांचे सुरक्षेकरीता महत्वाच्या सुचना यावेळी देण्यात आल्या...


महिलांच्या सुरक्षेकरीता रात्रीच्या व पहाटेच्या वेळी महिलांकरीता राखीव डब्यांमध्ये रेल्वे पोलीसांकडुन सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले आहेत. 



महिला प्रवाशांनी महिलांकरीता राखीव असलेल्या डब्यातूनच प्रवास करावा.

 

महिलांनी एकटे राखीव डब्यातुन प्रवास करतांना सुरक्षा कर्मचारी डब्यामध्ये आहे यांची खात्री करावी. सुरक्षा कर्मचारी नसल्यास, प्रवाशी असलेल्या डब्यातुन प्रवास करावा. 


रेल्वे स्टेशन अथवा रेल्वे प्रवासात कोणत्याही प्रकारची छेडछाडीची घटना होत असल्यास त्याची माहिती तात्काळ कर्तव्यावरील पोलीस अंमलदार अथवा रेल्वे पोलीस हेल्पलाईन क्र. 1512 यांना कळवावी.


लोकल गाडयांमध्ये चढण्यापुर्वी उतरणाऱ्या प्रवाशांना प्रथम उतरु द्यावे. 


लोकल गाडयांमध्ये चढतांना अथवा उतरतांना व प्रवासादरम्यान आपला मोबाईल, सॅगबॅग व इतर मौल्यवान चिजवस्तुंवर लक्ष द्यावे.


लोकल मध्ये चढतांना अथवा उतरतांना आपल्या जवळील सॅगबॅग पाठीवर न लावता समोर धरावी जेणेकरुन चोरांना चोरी करण्याची संधी मिळणार नाही.

 

प्रवासादरम्यान रॅकवर ठेवलेली सॅगबॅग व इतर सामान वारंवार चेक करुन रॅकवर असल्याची खात्री करावी.


प्रवासादरम्यान दरवाजात लटकुन प्रवास करु नये त्यामुळे जिवीतास तसेच मालमत्तेस धोका होऊ शकतो.


आपल्यासोबत असलेल्या लहान मुलांची काळजी घ्यावी.



 Press note       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज