मसाजच्या बहाण्याने गुगल पेद्वारे खंडणी वसुली - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, ११ जुलै, २०२३

मसाजच्या बहाण्याने गुगल पेद्वारे खंडणी वसुली

वाकोला पोलिसांनी सात जणांच्या मुसक्या आवळल्या

११जुलै २०२३

मुंबई, दादासाहेव येंधे : आमच्या मसाज पार्लर मध्ये चांगली मसाज मिळेल असे सांगत वाकोला येथील एका हॉटेलवर बोलून ते सात जण संबंधितांना पद्धतशीर धमकावत लूट करायचे. मसाज साठी ग्राहक आल्यावर त्याला हॉटेलमधील एका खोलीत घेऊन मग देशी कट्ट्याचा धाक ते दाखवायचे त्यानुसार त्या ग्राहकाचा मोबाईल, किमती ऐवज, रोकड काढून घ्यायचे. पैसे नसतील तर गुगल पे द्वारे दम देऊन खंडणी घेतली जायची. अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या सात जणांच्या टोळीला वाकोला पोलिसांनी नुकतेच गजाआड केले आहे.


पोलिसांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांना निलेश सरोज या तरुणाने संपर्क केला व आम्ही सध्या नवीन स्पा सुरू केला असून तेथे उत्तम सुविधा उपलब्ध असल्याचे तक्रारदाराला सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने मसाज करण्याची इच्छा बोलून दाखविल्यानंतर त्याला ७ जुलै च्या संध्याकाळी वाकोला येथील बाबा होम्स या हॉटेलमध्ये बोलविण्यात आले. तक्रारदार त्या हॉटेलात गेल्यानंतर त्याला एका खोलीत डांबण्यात आले. तेथे निलेश आणि त्याचा साथीदार आधीच दबा धरून बसलेले होते. तक्रारदार खोली जाताच निलेशने त्याला देशी कट्ट्याचा धाक दाखला व त्याच्याकडील १०,००० हजार रोख रक्कम काढून घेत  आणखी ८५ हजार रुपये गुगल पेद्वारे निलेश व त्याच्या अन्य चार साथीदारांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगितल्याचा धक्कादाय प्रकारानंतर तक्रारदाराने वाकोला पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकारा विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी खंडणी, लुटमारीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पाटील, रितेश माळी, अरुण बंडगर, सहदेव डोळे, सुनीता घाडगे या पथकाने तपास सुरू केला.


या गुन्ह्यातील एक आरोपी सपोनकुमार शीट (वय, ३८) यास जुहू येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. तर विशाल सिंग (वय,२०), आदित्य सरोज (वय,१९), सुरेश सरोज (वय, २१) आणि निलेश सरोज अशा चौघांना अंधेरी रेल्वे स्टेशन जवळ पकडण्यात आले. याशिवाय या गुन्ह्यातील आणखी दोघे सुरेश विश्वकर्मा आणि कुलदीपसिंग या दोघांना बाबा होम्स हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे, नऊ मोबाईल, दहा हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.


Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज