मुंबई, दि. १ : विलेपार्ले येथील कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुलाखालील 'हाइट बॅरियर'ला काल शुक्रवारी एका कंटेनरची धडक बसली. त्यामुळे उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. येथील वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी सायंकाळचे सहा वाजले. कंटेनरच्या धडकेमुळे पुलाखाली लावलेल्या हाईट बॅरियर चे नुकसान झाले असले तरी पुलाच्या संरचनेचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.
Photo: viral
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा