मुंबई, दादासाहेब येंधे : स्वतःच्या आरोग्याची चिंता न करता रुग्णांची काळजी घेणाऱ्या आणि त्यांना आजारातून उभे करणाऱ्या डॉक्टरांच्या कर्तव्याप्रति कृतज्ञता या भावनेने आज दिनांक १ जुलै २०२३ रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे च्या निमित्ताने जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने वैद्यकीय मदत व आरोग्य विषयक विविध उपक्रमांसाठी वेळोवेळी आणि गेली कित्येक वर्ष संस्थेला मदत व मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी डॉ. संगिता रावत - अधिष्ठाता, केईम रुग्णालय, डॉ. हरीष फाटक - अकॅडमी डीन, केईएम मेडिकल कॉलेज, डॉ. प्रविण बांगर - सिनियर AMO, डॉ. मनोज तेलकटवार - सहाय्यक डीन, डॉ. देव, डॉ. राणा, डॉ. ए. आर. चव्हाण - हृदयरोगतज्ञ, मसिना रुग्णालय, डॉ. गुस्ताद दावर - मेडिकल डायरेक्टर व शस्त्रक्रिया विभागप्रमुख, रिलायन्स फॉउंडेशन रुग्णालय व इतर मान्यवर डॉक्टरांचा जीवन प्रबोधिनी ट्रस्टचा कार्यअहवाल व वर्षा पवार-तावडे लिखित "ADOPTION - एक गुड न्यूज", "मनाला दार असतंय" ही पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सदर ट्रस्टचे संस्थापक श्री. सत्यवान नर यांच्या समवेत श्री. हेमंत मकवाना, श्री. गणेश पार्टे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Photo : viral
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा