सोनसाखळी चोरी व पोलीस बतावणी करणाऱ्यास अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

सोनसाखळी चोरी व पोलीस बतावणी करणाऱ्यास अटक

गाड्या आणि वेशभूषा बदलून इराणी परिसरात कारवाई


मुंबई, दि. २८ : मुंबई आरटीओ क्रमांकाची वाहने त्यातही जीप दिसली की इराणी चोरटे सावध व्हायचे, लगेच वस्तीमध्ये तसे कळून सर्वांना अलर्ट केले जायचे. इराणी चोरांची ही सावध भूमिका समजल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने आपली व्यूहरचना बदलली. पोलिसांनी गनिमी कावा केला. खाजगी टेम्पो रिक्षाचा वापर आणि वेशभूषा बदलून आंबिवली मध्ये सापळा रचला. मग वॉन्टेड असलेल्या एका सराईत चोराला पकडून आणले.


प्रॉपर्टी सेलने एका गुन्ह्यात इराणी वस्तीतील एक पुरुष व महिलेला अटक केली होती. त्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराचे नाव समजल्यानंतर पोलीस दोन वेळा आंबिवली येथील इराणी वस्तीत त्याला शोधण्यासाठी गेले. परंतु, स्थानिक रहिवाशी त्यातही महिलांच्या विरोधामुळे दोन्ही वेळा पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे पोलिसांनी आपली व्यूहरचना बदलली. कल्याण परिसरातील इराणी चोरटे प्रत्येक गाड्यांवर लक्ष ठेवतात. मुंबई आरटीओ क्रमांकाची वाहने त्यातही जीप दिसली की लगेच ते आपल्या वस्तीत सांगून सर्वांना अलर्ट करतात, ही बाब समजल्यानंतर प्रॉपर्टी सेलच्या पथकाने शक्कल लढवली. प्रभारी निरीक्षक शशिकांत पवार तसेच निगडे, पवार, साळुंखे आदींच्या पथकाने जीप किंवा अन्य वाहनांचा वापर न करता खाजगी टेम्पो, रिक्षाचा आधार घेतला. आपला गेटअप बदलला आणि आंबिवली येथे स्थानकाबाहेर तसेच परिसरातील रस्त्यांवर सापळा रचला. काबुली नौशाद अली जाफरी (वय,४०) हा सराई चोरटात तेथे येताच पोलिसांनी त्याला पकडले. जाफरी हाती लागल्याने सोनसाखळी चोरीचे दोन तर तोतया पोलीस म्हणून फसवणूक केलेले ७ अशा नऊ गुन्ह्यांची उकल झाली.


जाफरी याच्या विरोधात पायधुनी,  सांताक्रुझ, समता नगर, आर के मार्क, काळाचौकी, व्ही. बी. नगर,  अंधेरी, मेघवाडी, कस्तुरबा मार्ग, वर्सोवा,  विलेपार्ले, मुलुंड, कांजूरमार्ग, चेंबूर, पार्कसाईट, नेहरूनगर, अँटॉप हिल पोलीस ठाणे तसेच ठाणे नाशिक, रायगड, पुणे येथील पोलीस ठाण्यात मिळून एकूण ३६ गुन्ह्यांची नोंद आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज