Ticker

6/recent/ticker-posts

पनवेल मधून ३६३ कोटींचे हेरॉईन जप्त

कंटेनरचे दरवाजे वाजवल्याने लागला छडा


नवी मुंबई : दुबई येथून कंटेनरमध्ये लपवून आणलेले तब्बल ३६३ कोटी किमतीचे हेरॉईन नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करत जप्त केले आहे. मार्बल असल्याचे भासवून कंटेनरच्या चारही बाजूमध्ये हेरॉईन लपवून त्यावर वेल्डिंग करत ही तस्करी केल्याचे तपासात उघड झाले आहे.


कंटेनर घेण्यासाठी कोणीही न आल्याने नावाशिवा बंदरातील कस्टम तसेच डी आर आहे विभागाने त्याची तपासणी करून तो पनवेल येथील नवकार लॉजिस्टिक या गोदामात ठेवला होता त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत हा मुद्देमाल हस्तगत केला आता या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी एसटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली आहे.


न्हावा शेवा बंदरात परदेशातून आलेल्या एका कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांना दिली होती. त्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त सुरेश मेंगडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश घुर्ये यांनी एक पथक तयार केले. पथकाने न्हावा शेवा बंदर येथे जाऊन २७ डिसेंबर २०१९ रोजी बंदरात आलेल्या कंटेनरचा शोध घेतला. कंटेनरमध्ये असलेले मार्बल घेण्यासाठी कोणीही  न आल्याने कंटेनर पनवेल मधील नवकार लॉजिस्टिक मध्ये ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नवकार लॉजिस्टिक मध्ये जाऊन तपासणी केली असता त्यात मार्बल असल्याचे आढळून आले.


पोलिसांनी सर्व मार्बल बाहेर काढल्या नंतरही त्यात काहीही सापडले नाही. त्यानंतर कंटेनरच्या दरवाजाला असलेल्या चौकटीची बारकाईने पाहणी केली असता त्यामध्ये अमली पदार्थ लावल्याचा संशय आला. त्यामुळे हा दरवाजा यंत्राच्या साह्याने कापल्यानंतर त्यात अंमली पदार्थांची पाकिटे आढळून आली. पोलिसांनी कंटेनरच्या बाजूचे पत्रही कापले असता त्यात एकूण ७२ किलो ५७८ ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ३६२ कोटी ५९ लाख रुपये असल्याचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी सांगितले.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या