Ticker

6/recent/ticker-posts

उजव्या बाजूने अवजड वाहने चालविणाऱ्यांवर होणार कारवाई

वाहतूक पोलीस राबवणार विशेष मोहीम


मुंबई : रस्त्याच्या उजव्या बाजूने अवजड वाहने चालवणारे आणि वाहतूक कोंडीला जबाबदार ठरणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी आता आपल्या लिस्टवर आणले आहे. डाव्या लेनची शिस्त न पाळता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांच्या चालकांवर आता कारवाई केली जाणार आहे. वाहतूक नियमानुसार अवजड वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवणे बंधनकारक आहे. 


मात्र, बरेच चालक नियम धाब्यावर बसवत त्यांची अवजड वाहने बिनधास्तपणे रस्त्याच्या उजव्या बाजूने चालविताना सर्रासपणे दिसून येतात. यामुळे बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी होऊन अनेकदा अपघाताच्या घटना देखील घडतात. याची गंभीर दखल घेत अशा बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावायचे वाहतूक पोलिसांनी ठरवले आहे. अवजड वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवले जावेत यासाठी वाहतूक पोलिस लवकरच विशेष मोहीम राबवणार आहेत. उजव्या बाजूने अवजड वाहन चालविणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायदा कलम एमव्हीडीआर 4(5) 6(2)/177 अ अनव्ये कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहने चालविल्यास वाहतूक कोंडी होणार नाही असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 





Press Note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या