Ticker

6/recent/ticker-posts

लष्कर-ए-तोयबाचा आरोपीला मुंबई एटीएस करून अटक

मुंबई : राज्यातील तरुणांना लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेत भरती करून त्यांना अतिरेकी कारवाया करण्याचे प्रशिक्षण देण्याकरिता जम्मू काश्मीर येथे नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या काश्मीर येथील प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा चा सक्रीय सदस्य जुनैद मोहम्मद अता मोहम्मद (वय २८) याला दहशतवाद विरोधी पथकाने काल अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ३ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


काळाचौकी दहशतवाद विरोधी पथक पोलीस ठाण्यात लष्कर-ए-तोयबाच्या चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी गेली वर्षभर सुरू असताना नुकताच या गुन्ह्यातील आरोपी जुनैद मोहम्मद अता मोहम्मद याला अटक करण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपी फरार आहेत. अटक आरोपी जुनैद मोहम्मद अता मोहम्मद याला न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपी हा जम्मू काश्मीर येथील प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा च्या सक्रिय सभासदांच्या संपर्कात होता. त्यांच्या मदतीने वेगवेगळ्या राज्यातील तरुणांना कामाकरिता त्याला जम्मू कश्मीर येथील खात्यावरून त्याच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने अल्प कालावधीत वेगवेगळ्या मोबाईल कंपनीचे १० सिमकार्ड वापरल्याचे आढळून आले असून प्रत्येक संवादानंतर सिमकार्ड नष्ट करणे व नवीन सिम कार्ड खरेदी करणे अशी त्याची कार्यपद्धती होती. हे सर्व आरोपी भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेकी संघटनामध्ये भरती करण्यासाठी काम करीत होते. त्यांच्यावर तरुण मुलांची दिशाभूल करून त्यांच्या मनात देशाविरोधी भावना निर्माण करणे व त्यांचा लष्कर-ए-तय्यबा या अतिरेकी संघटनेमध्ये समावेश करून घेण्याची जबाबदारी हा त्यांचा मुख्य हेतू होता.










प्रेस नोट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या