पोलीस आयुक्तांचे आदेश
मुंबई : मुंबईकरांकडून करण्यात येणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींकडे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी तातडीने लक्ष दिले आहे. मुंबईतील नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पांडे यांनी बुधवारी मुंबईतील प्रमुख बांधकाम व्यावसायिकांची बैठक घेतली. इमारतींची बांधकामे ठरवून दिलेल्या वेळेतच करावीत. रात्री-अपरात्री करू नयेत अशा सूचना त्यांनी या बैठकीत केल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलीस आयुक्तपदाची सूत्रे घेताच पांडे यांनी सर्वसामान्य नागरिकांना समाज माध्यमांवरून वयक्तिक क्रमांक दिला. पोलीस दलामध्ये अपेक्षित असलेल्या सुधारणा तसेच तक्रारी, समस्या कळविण्यासाठी हा मोबाईल क्रमांक देत असल्याचे त्यांनी सांगितले होते. वाहतूक कोंडीच्या समस्येवर बरोबरच आयुक्तांकडे ध्वनिप्रदूषणाच्या अनेक तक्रारी आल्या होत्या.
यात प्रामुख्याने मुंबईत सुरू असलेली बांधकामे, विकास कामे यांच्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या होत्या. बांधकाम व्यवसायिक रात्री दहानंतरही काम सुरू ठेवतात. सकाळी सातनंतर काम सुरू करण्याऐवजी त्याआधीच सुरू करतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी पांडे यांनी बिल्डर्स असोसिएशनच्या पदाधिकार्यांची बुधवारी बैठक घेतली. यावेळी बांधकाम व्यवसायिकांना सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
CP order
0 टिप्पण्या