काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
मुंबई : बातमी एका धक्कादायक व्हायरल व्हिडिओची. हा व्हिडिओ काळजाचा थरकाप उडवेल. या व्हिडिओत पालकांचा निष्काळजीपणा मुलाच्या जीवावर बेतल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. बाईकचा स्टॅन्ड निसटल्याने मुलगा बाईकवरून खाली कोसळला. त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे.
एका लहान मुलाला दुचाकीवर एकटे सोडणं महागात पडले आहे. २ डिसेंबरचा सदर व्हिडिओ आहे. साईड स्टॅन्डला लावलेल्या बाईकवर बाळाला ठेवल्याचं दिसत आहे. मुलगा गाडीवर एकटाच होता. मात्र, अचानक स्टॅन्ड सटकला आणि बाळ रस्त्यावर पडलं. नेमका त्याचवेळी पाठीमागून एक ट्रक येत होता. आणि ट्रकची चाकं बाळावरून गेली. हा सगळा प्रकार रस्त्यावरील सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. आपली एक चूक किती महागात पडू शकते हे या व्हिडिओतून स्पष्टपणे समोर येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पहा...👇
Viral video
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा