गांजा तस्कर गजाआड - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

गांजा तस्कर गजाआड

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गांजाची तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. शकील शेख असे त्याचे नाव असून त्याच्याकडून १ लाख ३० हजारांचा गांजा जप्त केला आहे. रे रोडच्या मीरा दातार दर्ग्या जवळील झोपडपट्टीत एकजण तंबाखू मिश्रित गांजा विकत असल्याची माहिती व उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्या माहितीनंतर अधीक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश काळे, पराडकर, पवार, अहिरे, झाडे, कापसे यांच्या पथकाने तेथे सापळा रचून शकीलला ताब्यात घेतले.






















प्रेस नोट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज