मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी येथील बाळ गोपाळ मित्र मंडळातर्फे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यानिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, रांगोळी स्पर्धा, बक्षीस वितरण समारंभ आणि कोरोना संक्रमण काळात ज्यांनी अविरत कार्यसेवा केली. अशा कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यकमप्रसंगी मंडळाचे संस्थापक बाळा खोचरे, रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त भाई मयेकर, अध्यक्ष लक्ष्मण देवरुखकर, मुंबई समनव्यक सिद्धेश मंडलिक, शिवसेना भायखळा विधानसभा संघटक विजय (दाऊ) लिपारे, शिवसेना समाजसेवक दिलीप वागस्कर, घोडपदेव समूहाचे अध्यक्ष श्री. अशोक भिके, अनिल घाडीगांवकर, श्रीकृपा हौ सोसायटीचे अध्यक्ष संतोष सकपाळ आदी मंडळाचे कार्यकर्ते, रहिवाशी उपस्थित होते.
0 टिप्पण्या