सहा वर्षापासून धुमाकूळ घालणाऱ्या व पोलीसांना गुंगारा देवून पसार होणाऱ्या अट्टल गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या, कक्ष - ७ ने शिताफीने केले जेरबंद - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

सहा वर्षापासून धुमाकूळ घालणाऱ्या व पोलीसांना गुंगारा देवून पसार होणाऱ्या अट्टल गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या, कक्ष - ७ ने शिताफीने केले जेरबंद

१०० पेक्षा जास्त महागडी वाहने व वाहनांच्या काचा फोडून सोने, मोबाईल लॅपटॉप चोरी करून गेल्या सहा वर्षापासून धुमाकूळ घालणाऱ्या व पोलीसांना गुंगारा देवून पसार होणाऱ्या अट्टल गुन्हेगारास व त्याच्या साथीदारांना गुन्हे शाखेच्या, कक्ष - ७ ने शिताफीने जेरबंद केले

मुंबई : दि. २२/०८/२०२० रोजी पूर्व द्रुतगती मार्ग, ठाणे-मुंबई वाहिणी सर्विस रोड, जे.व्ही.एल.आर. ब्रीज जंक्शन जवळ, विक्रोळी पुर्व, मुंबई या ठिकाणी पार्क केलेल्या एकूण ०५ कारच्या काचा फोडुन कार मधील २,४४,५००/- रूपयांच्या मालमत्तेची चोरी झाल्याबाबत विकोळी पोलीस ठाणेस गुन्हा नोंद झाल्याबाबत गुन्हे शाखा कक्षास माहिती प्राप्त झाली.


विक्रोळी पोलीस ठाणे, गु.र.क्र. ५८७/२०२१ कलम ३७९,४२७ भा.द.वि. या गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने गेले ०२ महिने सतत सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी तसेच संशयीत आरोपीताच्या मोबाईल कमांकाचा तांत्रीक विश्लेषण केले असता, सदर गुन्हयातील संशयित  पाहिजे आरोपी हा दि. २८.१०.२०२१ रोजी पंतनगर बेस्ट डेपोच्या परीसरात आला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्र.पो.नि. श्रीधनकर यांचे मार्गदर्शनाखाली पथके तयार करून पंतनगर बेस्ट डेपोच्या परीसरात सापळा रचण्यात आला. 


संशयित पाहिजे आरोपी XUV-500 गाडी नंबर एम.एच-१४ डी.एफ.-०६३९ मधुन पंतनगर बेस्ट डेपोच्या बाजुच्या गल्ली मध्ये, बेस्ट वसाहत गेटच्या बाजुला, घाटकोपर पुर्व, मुंबई या ठिकाणी आला असता, त्याला कौशल्यपूर्वक गाडीसह ताब्यात घेवुन कक्ष कार्यालयात आणले.


ताब्यातील इसमाकडे वर नमुद गुन्हयाबाबत सखोल चौकशी केली असता, त्याने नमुद गुन्हयाची कबुली दिली व त्याचे ताब्यातील XUV-500 हि गाडी चोरीची असल्याची त्याने माहिती दिल्याने त्याची अंगझडती व नमुद वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये वाहनांचे काच फोडून चोरी करण्याकरीता लागणारे मल्टीपर्पज पक्कड, स्कु ड्रायवर, कटर, फोल्डींग चाळू, फायटर मुठ, स्टील पट्टी, पान्हे, लॉक खोलण्याची पीन, स्टीलची स्केल पट्टी तसेच विविध वाहनांचे आर.सी. बुक, वेगवेगळया इसमांचे आय.सी.आय.सी.आय. /एच.डी.एफ.सी./अँक्सीस/सिटी/इंडसइंड/स्टेट बँक इत्यादी बँकांचे डेबीट/केडीट कार्ड, विविध बँकेचे चेक्स, पोलीस/एस.आर.ए. अधिकारी/कक्ष अधिकारी/आयकर अधिकारी/वैद्यकीय अधिकारी/ उप विभागीय अधिकारी यांचे आयकार्डस्‌, पेनड्राईव्ह, डिजीटल वॉच, वेगवेगळया गाडयांच्या चाव्या, वाहनांचे दोन नंबर प्लेट MH-४६ AP ७४२३, इंडीयन आर्मीचे ओळखपत्र, विविध इसमांचे पॅनकार्ड/ आधारकार्ड, इंडीयन रेल्वेचे स्मार्ट कार्ड, सॅमसंग कंपनीचे तीन मोबाईल, पोलीस मॅरेथॉनचा टॉवेल तसेच एक तलवार मिळून आल्याने ते सर्व जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदरचा गुन्हा मा. वरिष्ठांचे आदेशाने गु.प्र.शा., गु.र.क्र. ८३/२०२१ अन्वये कक्ष-७ चे तपासावर घेण्यात आला असुन ताब्यातील इसमास सदर गुन्हयात अटक करण्यात आले आहे. त्यानंतर त्यास मा. न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास दि. ०९/११/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


नमुद आरोपीताची पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासादरम्यान सदर आरोपीताने सन २०१५ पासून अद्याप पर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, नाशीक, पूणे शहर, पिंपरी-चिंचवड, रायगड या परिसरात सुमारे १०० पेक्षा जास्त गुन्हे करून मोबाईल, लॅपटॉप, टॅब्स, आयपॉड, कॅमेरे व लेन्स, मोटार कार, रोख रक्कम व इतर वस्तुंची चोरी केली असल्याची कबुली दिलेली आहे. सदर आरोपीकडून चोरी केलेल्या मोबाईल फोन व वस्तू विकी करीता त्याच्या साथीदारास देत असल्याची कबुली दिल्यावरून त्यास उत्तर प्रदेश येथे पकडून नमुद गुन्हयात अटक करण्यात आले. तसेच चोरी केलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याकरीता त्याची खार येथे रहात असलेली पत्नी हिचा देखील गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने तीला नमुद गुन्हयात अटक करण्यात आले आहे.


नमुद आरोपीताकडून महिंद्रा XUV-500, इनोव्हा मोटार कार, होंडा सिटी या तीन गाडया हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. तसेच एकूण ०७ वाहन चोरीचे गुन्हे (दादर पोलीस ठाणे, बि.के.सी. पोलीस ठाणे, जुहू पोलीस ठाणे, ताडदेव पोलीस ठाणे, मुंबई, वागळे इस्टेट पोलीस ठाणे, ठाणे शहर, एन.आर.आय. पोलीस ठाणे, नवी मुंबई, सातपूर पोलीस ठाणे नाशीक शहर.) उघडकीस आले आहेत.


गुन्हा करण्याची पद्धत :- चोरीची मोटार कार वापरून त्यास बनावट नंबर प्लेट लावून, विवीध ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांची रेकी करून वाहनांचे काच फोडून वस्तुची चोरी करणे. तसेच सदर आरोपीतास पोलीसांनी पकडण्याकरीता सापळा लावल्यास त्यांच्यावर ताब्यातील वाहन जोरात चालवून अंगावर घालण्याचा प्रयत्न करून सुसाट पळून जाणे.

तसेच चोरी केलेले डेबीट कार्ड व मोबाईल फोन वापरून ए.टी.एम./मोबाईल अँप्लीकेशनव्दारे पिन रिसेट करून बँक खात्यातून पैसे काढणे. विकोळी पोलीस ठाणे गुन्हयात 0९ लाख रूपये ए.टी.एम. मधुन चोरले आहेत.

अटक आरोपी :-

१) एक पुरूष आरोपी, वय ३२ वर्ष, रा.ठी. बांद्रा पश्‍चिम, मुंबई व नालासोपारा(प.), जि. ठाणे

२) एक पुरूष आरोपी, वय ४५ वर्षे, रा.ठी. बहराईच ,उत्तर प्रदेश.

३) एक महिला आरोपी, वय ३२ वर्ष, रा.ठी. बांद्रा पश्‍चिम, मुंबई.

सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुकक्‍त(गुन्हे) श्री. विरेश प्रश्षु, पोलीस उप-आयुक्‍त (प्रकटीकरण-१) श्री. निलोत्पल, सहाय्यक पोलीस आयुक्त(डि-पूर्व) श्री. नितीन अलकनुरे, प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. मनिष श्रीधनकर यांचे मार्गदर्शनाखाली व महिला पोलीस निरीक्षक प्रिया थोरात, पोलीस निरीक्षक श्री सुधीर जाधव यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोगसिद्ध ओलेकर, पोलीस उप निरीक्षक अतिश लोहकरे, माधवानंद धोत्रे, निलेश चव्हाण, रामदास कदम, स्वप्निल काळे, नामदेव परबळकर, पोलीस हवालदार दिपक पवार, संतोष गुरव, राजेंद्र शिंदे, प्रदिप बडगुजर, सुभाष मोरे, शशीकांत कांबळे, पोलीस नाईक गिरीश जोशी, विशाल शिंदे, विनोद पांडे, सचिन गलांडे, प्रमोद जाधव, गौरव सोनावणे, पोलीस शिपाई दिपक खरे, विकास होनमाने, महेश सावंत, जितेंद्र पाटील, गणेश पाटील, हिना शेख यांचेसह पोलीस नाईक चालक राजाराम कदम, दिलीपराव राठोड यांनी पार पाडली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज