दोन परदेशी नागरिकांना अटक
मुंबई, दादासाहेब येंधे : दोन परदेशी नागरिकांची संशयास्पद हालचाल दिसून आल्याने पोलिसांनी दोन आरोपी १) साद मगाला कामण्या सलीम , वय ५० वर्ष , राहणार- गाव टोपांगा, जिल्हा-किसावुनी, राज्य- मोम्बासा, देश- केनिया,२) जम्बो मगाला कामण्या सलीम , वय ४३ वर्ष, राहणार - मामोद मस्जिदजवळ, गाव किटुनडा, जिल्हा ईलाला , राज्य दारेसलाम, देश टांझानिया यांना अटक केली आहे.
दिनांक ०७/०८/२०२१ रोजी पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश लिंगे , सहायक पोलिस निरीक्षक गजानन भारती, स.फौ. गोरेगावकर , पो. ह.जाधव , पो.ना.देशमुख , पो. शि.शिंदे , पाटील व पानखडे स्टाफ असे फरार आरोपी याचा शोध घेत असताना ते सरकारी वाहनातून मोहम्मद अली रोडवरून जात असताना शालिमार हॉटेलच्या खाली, वजीर बिल्डिंगच्या प्रवेशद्वारांजवळ (पायधुनी पोलिस स्टेशनची हद्द) दोन परदेशी नागरिक संशयास्पद हालचाली करताना दिसून आल्याने सरकारी वाहन थांबवून त्यांना चेक केले असता त्यातील आरोपी नंबर एक याच्याकडे ११० ग्रॅम कोकीन व ३००० रोख रक्कम मिळून आले, आरोपी नंबर दोन याच्याकडे १५ ग्रॅम कोकीन व १००० रुपये रोख रक्कम मिळून आले. एकूण १२५ ग्रॅम कोकीन हे सदर दोन आरोपी यांनी आपसात संगनमत करून बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेले मिळून आले. म्हणून सदर दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेऊन पायधुनी पोलीस स्टेशन याच्या ताब्यात देऊन एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), सह २१ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक सोपान काकड यांनी दिली आहे.
प्रेस नोट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा