मुंबई : गेल्या तीन चार दिवसांपासून जुहू किनाऱ्यावर ब्ल्यू बॉटल जेलीफिश दिसू लागले आहेत. गेले काही दिवस कमी प्रमाणात हे जलचर किनाऱ्यावर दिसू लागले आहेत. मात्र त्यांची संख्या गेल्या दोन- तीन दिवसांपासून वाढू लागली आहे. त्यामुळे सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ब्ल्यू बॉटल जेलीफिश या जलचरांना पारदर्शक फुग्यासारखा भाग असतो. त्याखाली निळ्या रंगाचे धाग्यासारखे शुंडक असतात. या शुंडकांना स्पर्श झाल्यास ते दंश करतात. हा दंश अत्यंत वेदनादायी असतो.

0 टिप्पण्या