लोकलच्या दरवाज्यावर उभा असलेला प्रवासी तोल जाऊन पडलेल्यास वाचविले
मुंबई, दादासाहेब येंधे : हार्बर मार्गावरील चुनाभट्टी स्थानकावर धावत्या लोकलमधून तोल जाऊन प्रवासी पडला. मात्र, स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या महिला लोहमार्ग पोलिसाने त्या प्रवाशाला तात्काळ खेचुन त्याचा जीव वाचविला.
चुनाभट्टी रेल्वे स्थानकावर पोलीस अंमलदार नम्रता तांदळे या दिवसपाळी कर्तव्यावर होत्या. चुनाभट्टीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर सिएसएमटी दिशेकडे जाणारी लोकल थांबली होती. काही वेळातच लोकल सुरू झाली. त्यावेळेस लोकलच्या दरवाजावर उभा असलेला प्रवासी तोल जाऊन फलाटावर पडला. हे पाहताच कर्तव्यावर असलेल्या नम्रता तांदळे या महिला पोलिसाने सतर्कता दाखवत त्याला हाताला धरून बाजूला केले. परिणामी, त्याचे प्राण वाचले. त्या प्रवाशाला गोंदिया-नागपूर येथे जायचे असल्याने त्याला लगेच दुसरी लोकल पकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बसून देण्यात आले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा