मुंबई, दादासाहेब येंधे : दहिसर येथील ओम साईराज ज्वेलर्सचे मालक शैलेंद्र रमाकांत पांडे यांची गोळ्या झाडून हत्या करून पळून गेलेल्या तीन शूटरसह दोन स्थानिक तरुणांना दहिसर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत शिताफीने अटक केली. आयुष पांडे, निखिल चांडाल, चिराग रावल, अनिकेत महाडिक आणि उदय बाली अशी या पाचजनांची नावे असून त्यांनी चोरीच्या उद्देशाने शैलेंद्र यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या गोळीबाराचा मास्टरमाईंड मध्य प्रदेशात असून त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
याबाबत सविस्तर असे की, ३० जून २०२१
रोजी सकाळी १०.३० वा. चे सुमारास दहिसर पोलीस ठाणे हद्दीत
गावडे नगर, रावळपाडा, दहिसर पुर्व मुंबई येथील ओम साई राज ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानामध्ये दुकान मालक श्री.
शेलेंद्र रमाकांत पांडे, वय ४० वर्षे राहणार
दहिसर पुर्व मुंबई हे नियमित काम करीत असताना तीन अनोळखी इसमांनी आत शिरुन त्यांच्याकडील अग्नीशस्त्रातुन दुकान मालक श्री. शैलेंद्र पांडे
यांच्या दिशेने गोळया
झाडुन त्यांना गंभीर जखमी केले व
दुकानातील अंदाजे २० तोळे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे
रु. १० लाख ची जबरी चोरी केली. नमुद जखमी श्री. शैलेंद्र पांडे यांना
उपचारार्थ रुग्णालयात आणले असता त्यांना दाखलपूर्व मयत
घोषित करण्यात आळे. याबाबत दहिसर पोलीस ठाणे येथे गु.रक्र.८९१/२०२१ कलम
४५२,३९७,३०२,३४ भादवि सह ३,२५,२७ भाहका सह कलम ३७ (९)(अ), १३५
मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हयाच्या
तपासादरम्यान पाहिजे आरोपींचे उपलब्ध वर्णन, तसेच गुप्त बातमीदाराकडुन प्राप्त माहितीच्या आधारे पाहिजे आरोपींविषयी,त्यांच्या ठावठिकाणाविषयी
माहिती मिळविण्यात आली. व १० विशेष पथके नेमुन अविरतपणे तपास करुन
गुन्हयातील तीन अनोळखी
आरोपी इसम व त्यांचे दोन साथीदार असे एकुण
पाच आरोपींचा ठावठिकाणा शोधुन त्यांना ग्राम - बारबोधन ता. ओलपाड जि.सुरत राज्य
गुजरात येथुन ताब्यात घेण्यात आले व त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांचा
गुन्हयातील सहभाग निश्चत झाल्याने त्यांना सदर गुन्हयात
अटक करण्यात आली.
गुन्हयातील अटक
आरोपींकडुन जबरीने चोरुन नेलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने तसेच गुन्हयात वापरलेले हत्यार एक गावठी कट्टा व दोन जीवंत काडतुसे हस्तगत
करण्यात आले असुन इतर दागिने तसेच गुन्हयात वापरलेले
अग्निशस्त्रे हस्तगत करण्याच्या दृष्टीने अटक आरोपींकडे
कसुन तपास सुरु आहे.
सदर कारवाई मा.
पोलीस सह आयुक्त ( का. व सु. ) श्री. विश्वास नांगरे पाटील,मा. अपर
पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग श्री. दिलीप सावंत, मा. पोलीस उपआयुक्त,
परिमंडळ-९२, डॉ. स्वामी, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री. सुहास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्र. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल आव्हाड,
पो.नि संजय मराठे, घो.नि रोकडे, पोनि लोकरे, सपोनि डॉ.चंद्रकांत
घार्ग, ओम तोटावार, अभिनय पवार ,प्रविण निंबाळकर, पोउपनि सुनिल पोवार, शिवाजी
देसाई, दुधमल, पो.ह. परब, गायकवाड, पांगे, खडपे,
तटकरे, पो.ना. शेख, मोरे, किणी, मोहिते, पोळ, सांबरेकर, केळजी, चिकणे, पोशि शिरसाट, हिरेमठ, लहांगे, सय्यद, सागर पवार योनी करुन अथक परिश्रम घेवुन
कौशल्यपुर्वक सदरचा गुन्हा उचडकीस आणुन उल्लेखनिय कामगिरी केली
आहे.

0 टिप्पण्या