कोळी भवन येथे या परिसरातील कोळी
बांधवांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले असून वरळी म्युनिसिपल शाळेत पोलिसांच्या
कुटुंबियांना व परिसरातील नागरिकांना लस उपलब्ध केली जाणार आहे. मुंबई
महानगरपालिकेच्या माध्यमातून आनंद राठी आणि ‘लिव्ह टू गिव्ह फाऊंडेशन’ आणि
सुराना हॉस्पिटलच्या सौजन्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये
सुमारे पंधराशे जणांचे लसीकरण केले जाणार आहे.
यावेळी मुंबईच्या महापौर
किशोरी पेडणेकर, माजी मंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, पोलीस उपायुक्त परमजित सिंह दहिया, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या