पोलिसांकडून तपास सुरू
मुंबई , दादासाहेब येंधे : दहिसर पूर्व येथील गावडे नगर परिसरात ओम साईराज ज्वेलर्सवर तीन अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानाची लूटमार केली आहे. दुकानदाराला गोळी लागली असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. बुधवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली आहे. तीन आरोपी हे बाईकवरून आले होते. दुकानदार दुकान उघडून बसला होता. खरेदी करण्याच्या बहाण्याने या तिघांनी दुकानात प्रवेश केला. तिघांनी दुकान लुटण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तेथे ज्वेलर्स मालकाव्यतिरिक्त इतर कुणीही नव्हते. अज्ञात चोरांना विरोध केल्याने त्यांनी मालकाच्या दिशेने गोळीबार केला. आरोपी दुकानातील काही माल घेऊन बाईकवरून फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून सीसीटीव्हीच्या मदतीने पुढील तपास पोलीस करीत आहेत.



0 टिप्पण्या