अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस २४ तासात गुन्हे शाखाने केले जेरबंद.
मुंबई, दादासाहेब येंधे :
पत्नीच्या मित्राला घरी पाहिल्यानंतर संतप्त पतीने २९ वर्षांच्या मित्राची मारहाण करत चाकूहल्ल्याने हत्या केल्याची घटना अंधेरी घडली. संतोष असे मृताचे नाव असून हत्येनंतर फरारी आरोपी पतीला सायन-अॅन्टाॅपहील हिल येथून अंबोली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. अनैतिक संबंधाच्या संशयावरुन हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. म्हणून आंबोली पोलीस ठाणेत गु. र. क्रमांक. ५५६/२१ कलम ३०२, ५०६ (२), ३२३,भा द वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अंधेरीतील विरा देसाई रोड, जीवननगर परिसरात आरोपी हा पत्नी आणि १५ वर्षांच्या मुलासोबत राहतो. संतोष त्याच्या पत्नीचा मित्र असून तो नेहमीच घरी येत होता.
दिनांक १०/७/२१ रोजी पहाटे ०५.०० वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीवन नगर साईबाबा मंदिराजवळ, ऑफ विरा देसाई मार्ग, अंधेरी( प.), मुंबई ५३ येथे यातील अटक आरोपी हा रात्रपाळी ड्युटी करून अचानक लवकर घरी आल्यावर त्याने दरवाजा ठोठावला. त्याने दार ठोठावून दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याला संशय आला. त्यानंतर त्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला असता तिने दरवाजा उघडला. यावेळी त्याला संतोष हा घरी दिसला, त्याला घरी पाहिल्यानंतर तो प्रचंड संतापला. त्याने त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्याने संतोषवर चाकूने वार केले. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेनंतर आरोपी पती तेथून पळून गेला. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच अंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतोषला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी १५ वर्षांच्या मुलाने घडला प्रकार सांगितला. त्यावरुन पोलिसांनी सावत्र पित्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच ही हत्या केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून लागलीच गु.प्र.शा. गुअ.वि. कक्ष-४ चे एक पोलीस पथक निर्माण करण्यात आले.
सदर पथक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना नमूद आरोपी मक्कावाडी ॲअॅन्टाॅपहील वडाळा मु -३७ परिसरात मिळून आल्याने पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेण्यात आले व कक्ष कार्यालयात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपीस कायदेशीर बाबींची पूर्तता करून पुढील तपाासकमी आंबोली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी ही मा. सह पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री मिलिंद भारंबे, अप्पर पोलीस आयुक्त श्री विरेश प्रभू, पोलीस उप आयुक्त श्री प्रकाश जाधव, सहायक पोलिस आयुक्त नितीन अलकनुरे, यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे, सपोनि. बिराजदार, पो.ह. ३४२७९ कांबळे, पो.ह. ९६०६३३ बल्लाळ, पो.ह. ३०५९३ उत्तम बोटे, पो.ह. २८७९० सावंत, साळुंखे, पो.शि. ०७१५२१ जगताप पो.शि.०९२११४ रोटे यांनी पार पाडलेली आहे.
0 टिप्पण्या