स्लॅब खचल्याने कार विहिरीत बुडाली
मुंबई, दादासाहेब येंधे : घाटकोपर येथे विहिरीवरील स्लॅब कोसळल्याने त्यावर पार्क केलेली कार बुडाल्याची घटना घाटकोपरच्या करानीलेन परीसरात घडली आहे. कारमध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली आहे.
करानीलेनमधील राम निवास इमारतीसमोर ७० ते ८० वर्षे जुनी विहिर आहे. सदर विहिरीच्या अर्ध्या भागावर वाहने पार्क करण्यासाठी आरसीसीचे बांधकाम करण्यात आले होते. राम निवास इमारतीत राहणारे डॉ. किरण दोशी यांनी १२ जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपली कार पार केली होती. दरम्यान सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास विहिरीवरील स्लॅब कोसळल्याने दोशी यांची कारही ८० फूट विहिरीत पडली. अग्निशमन दल व पोलीस तसेच पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरा कार बाहेर काढली.

0 टिप्पण्या