Ticker

6/recent/ticker-posts

बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

मुंबई : बुद्धपौर्णिमेनिमित्त राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल भगवान बुद्धांच्या मुर्तीला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी केंद्रीय समाज कल्याण व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योजिका कल्पना सरोज तसेच बौद्ध भंते उपस्थ‍ित होते. 

यावेळी राज्यपालांच्या हस्ते भगवान बुद्ध यांच्या जीवनावरील चित्रकृतींचा समावेश असलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. रामदास आठवले यांनी राज्यपालांना भगवान बुद्धांची प्रतिमा भेट दिली. राज्यपालांच्या हस्ते भंतेना चिवरदान करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या