Ticker

6/recent/ticker-posts

‘दिलखुलास’ कार्यक्रमात माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत

 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य’ या विषयावर मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य' या विषयावर माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची  विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एअर या ॲपवरून मंगळवार दि. 13 आणि बुधवार दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका  डॅा. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे. 

14 एप्रिल या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून ही मुलाखत घेण्यात आली आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, कार्य, आर्थिक विचार, हिंदू कोडबिल बाबतचे विचार, भारतीय कामगार चळवळीला नवीन दिशा देण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, बाबासाहेबांचे शिक्षणाबद्दलचे विचार, समाजाला दिशा देणारी पत्रकारिता आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. मुणगेकर यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या